पुणे : विराट कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये भारताला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले. यानंतर विराटला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात स्थान मिळाले. या संधीचा लाभ उठवत पुढे विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार खेळाडू म्हणून उदयास आला.
सौरभ तिवारी, उन्मुक्त चंद, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, शिवम मावी हे इतर अनेक अंडर-19 क्रिकेटपटूंपैकी आहेत, ज्यांनी त्यांच्या दमदार कामगिरीमुळे, आयपीएल वर्तूळात ओळख मिळवली आणि आयपीएल लिलावात त्यांना मोठ्या बोली मिळाल्या. सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघात अनेक प्रतिभावान आणि कुशल क्रिकेटपटू आहेत.
ज्यांनी दमदार कामगिरी करत आपली छाप सोडली आहे. आयपीएल 2022 च्या हंगामासाठी फ्रेब्रुवारीत मेगा लिलावात होणार आहे. या लिलावत या अंडर-19 क्रिकेटपटूंना मोठ्या प्रमाणात संधी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मेगा लिलावत मोठी बोली लागण्याची शक्यता असलेल्या 5 खेळाडूंवर प्रकाश टाकणारा आहोत.
1) राजवर्धन हंगरगेकर
राजवर्धन हंगरगेकरला त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे 19 वर्षाखालील संघ सहकार्यांपेक्षा सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या या वेगवान गोलंदाजाने 3 सामन्यात 15.75 च्या जबरदस्त सरासरीने 4 बळी मिळवले आहेत. याचबरोर हंगरगेकर षटकार मारण्यासाठी ओळखला जातो.
आयर्लंडविरुद्ध 17 चेंडूंत नाबाग 39 धावांच्या खेळीत राजवर्धनने 5 उत्तुंग षटकार आणि एक चौकार ठोकला. त्याने याआधी विजय हजारे ट्रॉफीमध्ये 5 लिस्ट-ए सामने खेळून 10 बळी घेतसे आहेत. यामुळे आयपीएल 2022 मेगा लिलावात सर्वच संघ त्याच्यासाठी मोठी बोली लावण्याचा प्रयत्न करतील.
2) अंगकृष्ण रघुवंशी
सलामीवीर अंगकृष्ण रघुवंशी हा 19 वर्षांखालील खेळाडूंपैकी एक आहे ज्याला संधी मिळाल्यास तो आयपीएलमध्ये गाजवू शकतो. उजव्या हाताचा हा फलंदाज अंडर-19 विश्वचषकात आतापर्यंत 3 सामन्यांत 228 धावांसह भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. दिल्लीत जन्मलेल्या 16 वर्षीय अंगकृष्णने आयर्लंडविरुद्ध 79 धावा केल्यानंतर युगांडाविरुद्ध 144 धावांची खेळी केली होती.
3) हरनूर सिंग
हरनूर सिंग हा भारताच्या अंडर-19 संघाचा दुसरा सलामीवीर आहे. पंजाबचा 18 वर्षीय हा अत्यंत प्रतिभावान फलंदाज अंडर-19 संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध 88 धावा करून सामनावीराचा पुरस्कार पटकावला आणि सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झटपट शतक झळकावले. हरनूर हा भारताच्या 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू होता. आयपीएल 2022 मेगा लिलावात तो एक हॉट पिक असू शकतो.
4) राज बावा
राज बावाने अंडर-19 विश्वचषकात नुकतेच युगांडा विरुद्ध 108 चेंडूत नाबाद 162 धावांची धमाकेदार खेळी करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. राजच्या या खेळीत 14 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.
हिमाचल प्रदेशचा राज बावा, मधल्या फळीतील फलंदाज, मध्यमगती गोलंदाजीचा एक सुलभ पर्याय देखील देतो – त्याने 3 सामन्यात 4 बळी घेतले आहेत. म्हणून त्याच्या अष्टपैलू कौशल्याला आयपीएल लिलावात मागणी असेल.
5) विकी ओस्तवाल
डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवा, सध्या सुरु असलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे, त्याने 3 सामन्यांत 7 बळी घेतले आहेत. पुण्याच्या 19 वर्षीय खेळाडूने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाच बळी मिळवले होते. त्यामुळे विकी ओस्तवाल याला आयपीएल 2022 मेगा लिलावामध्ये मोठ्या कराराची अपेक्षा आहे.
6) यश धुल
भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार यश धुल हा आणखी एक अत्यंत प्रतिभावान फलंदाज आहे. कोरोना झाल्यामुळे धुल अंडर-19 विश्वचषकातील शेवटचे दोन सामने खेळू शकला नाही, परंतु त्याआधीच्या तीन सामन्यात त्याने सलग तीन अर्धशतके झळकावली होती. गेल्या महिन्यात धुलने अंडर-19 आशिया कप ट्रॉफीसाठी संघाचे नेतृत्व केले होते.