अहमदाबाद – एबी डीव्हीलियर्सच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स संघावर १ धावने रोमांचक विजय मिळवला.
पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या बंगळुरू संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १७१ धावा केल्या. यामध्ये एबी डिव्हीलियर्सने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४२ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ७५ धावा केल्या. तर रजत पाटीदारने ३१ धावा केल्या.
प्रत्युत्तर दिल्ली संघाने २० षटकांत ४ बाद १७० धावांपर्यंतच मजल मारता आली. शेमरॉन हेटमायरने अर्धशतकी खेळी केली. त्याने २५ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. तर पंतने नाबाद ५८ धावा केल्या. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात दोघं अपयशी ठरले. हर्षल पटेलने दोन विकेट घेतल्या.