मुंबई – क्रिकेटपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय काहीदिवसांपूर्वी घेण्यात आला.
करोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आता पुढचे सामने कधी खेळवण्यात येणार याबाबत अजून काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र, आता लवकरच आयपीएल स्पर्धा सुरू होणार आहे.
आयपीएलच्या चौदाव्या पर्वातील उरलेल्या मॅचेस 19 किंवा 20 सप्टेंबर रोजी सुरू होण्याची शक्यता आहे. स्पर्धेतील उर्वरित 31 सामने मागच्या वर्षीप्रमाणे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईत खेळवल्या जाणार आहेत.
तसंच जगातील सगळ्यात लोकप्रिय टी-ट्वेंटी स्पर्धा अर्थात आयपीएलची फायनल मॅच 10 ऑक्टोबरला खेळविण्याचं नियोजन आहे. बीसीसीआय लवकरच ही घोषणा करण्याच्या तयारीत आहे.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने या बाबत माहिती दिली आहे. दरम्यान,भारतातल्या करोनाच्या संकटामुळे मागच्या वर्षाची आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये खेळवली गेली होती.