IPL 2021 Suspended: अनिश्चित काळासाठी यंदाची आयपीएल रद्द

यंदाच्या वर्षीची 14 वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्याचं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि बीसीसीआयच्या आपत्कालीन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

देशात कोरोनाचा वाढता धोका आणि सध्या आयपीएलमधील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार,  स्पर्धा तूर्तास रद्द करण्यात आली असून, पुढील काळात त्यासाठीच्या नव्या तारखा जाहीर होऊ शकतात. पण, सध्या प्राधान्य हे खेळाडू आणि त्यांच्या आरोग्यालाच देण्यात आलेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.