IPL 2021 : पंजाबविरुद्ध राजस्थानचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

मुंबई – इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल स्पर्धेत यंदा राजस्थान रॉयल्सचा संघ गेल्या काही वर्षांइतका तुल्यबळ नाही. कर्णधार संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथसारखे धडाकेबाज फलंदाज असले तरीही पंजाब किंग्जच्या तगड्या फलंदाजीमुळे त्यांचेच पारडे या सामन्यात जड राहणार आहे.

दुसरीकडे पंजाबच्या संघात कर्णधार लोकेश राहुल, मयंक आग्रवाल, ख्रिस गेल, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, सर्फराज खान व निकोलस पुरन अशी अत्यंत बलाढ्य फलंदाजी असल्याने त्यांना कसे रोखायचे यावर राजस्थानच्या गोलंदाजांना काथ्याकूट करावा लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.