चेन्नई – पंजाब किंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैद्राबाद संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी यापूर्वीचे आपले सामने गमावले असून आज विजय मिळविण्यासाठी उभय संघ प्रयत्नशील असणार आहे.
आधीच्या सामन्यात पंजाबचा पराभव दिल्ली कॅपिटल्स संघाकडून झाला होता. तर हैद्राबाद संघाला मुंबई इंडियन्स संघाने मात दिली होती.