IPL 2021 : चहरचा भेदक मारा; मुंबईचा हैद्राबादवर रोमांचक विजय

चेन्नई – राहुल चहर आणि ट्रेन्ट बोल्ट यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने इंडियन प्रीमियर टी-२० क्रिकेट स्पर्धेत सनरायजर्स हैद्राबाद संघावर १३ धावांनी रोमांचक विजय मिळवला. मुंबईचा सलग हा दुसरा विजय ठरला आहे.

प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्स संघाने संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १५१ धावा केल्या. प्रत्युत्तर हैद्राबाद संघाला २० षटकांत सर्वबाद १३७ धावापर्यंतच मजल मारली. राहुल चहरने १९ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या. बोल्टने २८ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले.

विजयासाठी १५२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैद्राबाद संघाने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार डेव्हीड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्ट्रो यांनी ६७ धावांची सलामी दिली. बेअरस्ट्रो २२ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकार मदतीने ४३ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला मनिष पांडेही (२) बाद झाला. तर वॉर्नर (३६) धावबाद झाला. त्यानंतर विजय शंकरने २८ धावा केल्या. मात्र संघाला विजय मिळवन देण्यात तो अपयशी ठरला.

मुंबईने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विटंन डी कॉक या दोघांनीही मुंबईला चांगली सुरुवात करुन देत अर्धशतकी भागीदारी रचली. पण ही भागीदारी रंगत असतानाच विजय शंकरच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा विराट सिंगकडे झेल देऊन 32 धावांवर बाद झाला. त्याने 25 चेंडूत प्रत्येकी 2-2 चौकार आणि षटकार खेचले.
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या सुर्यकुमारनेही अश्वासक सुरुवात केली. मात्र, 1 चौकार आणि 1 षटकारासह 6 चेंडूत 10 धावा करुन तो नवव्या षटकात विजय शंकरच्याच चेंडूवर बाद झाला. त्याचा झेल शंकरनेच घेतला. त्याच्यानंतर ईशान किशन आणि डी कॉकची साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, एक बाजू सांभाळत असलेल्या डी कॉकचा अडसर मुजीब रहमानने दुर केला. डी. कॉकने 39 चेंडूत 40 धावांची खेळी केली.

यानंतर मधल्या फळीतील फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली आहे. अखेरच्या षटकामध्ये कॅरन पोलार्डने सलग दोन षटकार खेचत संघाला 150चा आकडा पार करून दिला. कॅरन पोलार्डने नाबाद 35 धावा केल्या.

हैदराबादकडून विजय शंकर आणि मुजीब रहमान यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर खलील अहमदने 1 विकेट घेवून त्यांना सुरेख साथ दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.