IPL 2021 : पोलार्डच्या तडाख्याने चेन्नईची धुळधाण; मुंबईचा ‘सुपरविजय’ 

नवी दिल्ली – किरॉन पोलार्डच्या  वादळी अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्स  संघावर ४ गडी राखून रोमांचक विजय मिळवला. मधल्या फळीतील पोलार्डने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करताना आयपीएलच्या या हंगामातील १७ चेंडूंत वेगवान अर्धशतक केलं. त्याने ३४ चेंडूंत ६ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ८७ धावा केल्या.

प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद २१८ धावांचा डोंगर उभारला. यामध्ये अंबाती रायुडूने २७ चेंडूंत ४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ७२ धावा केल्या. तर मोईन अलीने ३६ पाच चौकार व पाच षटकारांसह ५८ धावा कुटल्या. तर डुप्लेसिसने २८ चेंडूंत दोन चौकार आणि ४ षटकारांसह ५० धावा केल्या.

मुंबईकडून केरॉन किरॉन पोलार्डने २ विकेट घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तर मुंबई संघाने २० षटकांत ६ बाद २१०  धावा करून विजयाची नोंद केली. सलामीवीर रोहित शर्मा (३५) आणि क्विंटन डीकॉक (३८) यांनी ७१ धावांची सलामी दिली. दोघं बाद झाल्यानंतर पोलार्ड आणि क्रुणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. पांड्या बाद झाल्यानंतर पोलार्डने षटकारांची आतषबाजी कायम ठेवत मुंबईचा विजय साकार केला.  चेन्नईकडून सॅम करनने तीन विकेट घेतल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.