IPL 2021 : वेळापत्रक जाहीर होताच CSKच्या अडचणीत वाढ

यंदा आयपीएलचा चौदावा हंगाम हा भारतातच खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक असणारे वेळापत्रक रविवारी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने जाहीर केले. त्यामुळे 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. मात्र या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होताच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या अडचणीत वाढ झाली.

आयपीएलचा चौदावा हंगाम हा कोलकात्ता, बेंगलोर, चेन्नई, मुंबई आणि अहमदाबाद येथे पार पडणार आहे. त्याचबरोबर चौदाव्या हंगामात कोणत्याच संघाला एकही सामना आरल्या घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. कारण प्रत्येक संघाला वेगवेगळ्या मैदानावर सामने खेळावे लागणार आहेत. चेन्नई संघाला 14पैकी 10 सामने अशा मैदानावर खेळाणार आहे,ज्या मैदानावर खेळपट्टीची फिरकीला मदत मिळत नाही. परंतु दिल्लीच्या मैदानावर होणाऱ्या 4 सामन्यात फिरकीला मदत मिळणार आहे.

मुंबईचं वानखेडे स्टेडियम, बँगलोरचं चिन्नास्वामी स्टेडियम आणि कोलकात्याच्या इडन गार्डनवर फिरकी गोलंदाजांना फार चमक दाखवता येत नाही. त्याचबरोबर या मैदानाचा आकार लहान असत्याने याचा फायदा फलंदाजांना होतो.

तत्पुर्वी 18 फेब्रुवारीला चेन्नई येथे चौदाव्या हंगामाचा लिलाव पार पडला. या लिलावात चेन्नई संघाने फिरकी गोलंदाजांवर बोली लावत मोईन अली आणि कृष्णप्पा गौतम या फिरकी गोलंदाजांना घेऊन फिरकी गोलंदाजी मजबूत केली होती. परंतु फिरकीला साथ देणाऱ्या मैदानावर फक्त चार सामने होणार असल्याने चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात निराशा ओढवली आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाजांच्या बाबतीत कर्णधार महेंद्रसिंग धोनी कोणती भूमिका घेतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा संपुर्ण संघ ( २५ खेळाडू (८ परदेशी) –
एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा, कृष्णप्पा गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के भागवथ वर्मा, सी हरी निशांथ, एम हरिशंकर रेड्डी.
साखळी फेरीतील सीएसकेचा संपूर्ण कार्यक्रम:

दिनांक संघ ठिकाण
१० एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
१९ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई, दुपारी ३.३०
२८ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
१ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
५ मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
७ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, बंगळुरू, दुपारी ३.३० वाजता
१२ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.