मुंबई – लोकश राहुलचे आणि दीपक हुडा यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाब संघाने विजयासाठी राजस्थान रॉयल्स संघासमोर २२२ धावांचे आव्हान ठेवले.
प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबने निर्धारित २० षटकांत ६ बाद २२१ धावा केल्या. यामध्ये लोकेश राहुलने सर्वाधिक ९१ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी केली.
नाणेफेक जिंकून राजस्थानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर मयंक अगरवाल १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या ख्रिस गेलने चौफेर फटकेबाजी करत २८ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. रियान परागने त्याला तंबूत धाडलं. त्यानंतर आलेल्या दीपक हुडाने राहुलच्या साथीत राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. हुडाने २८ चेंडूत सहा षटकार आणि ४ चौकारांची आतषबाजी करत ६४ धावा केल्या. हुडा बाद झाल्यानंतर राहुल ९१ धावांवर बाद झाला. त्याचं थोडक्यात शतक हुकलं.
राजस्थानकडून चेतन सकारियाने तीन विकेट घेतल्या. ख्रिस मॉरिस दोन तर रियान परागने एक गडी बाद केला.