दुबई- भारतातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेची उत्सुकता जगातील अनेक क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. या स्पर्धेचा बिगुल आज 19 सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 7:30 वाजता यूएईमध्ये वाजणार आहे.
सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्या दरम्यान अबुधाबी येतील शेख झायेद या स्टेडियमवर होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण स्टार नेटवर्कवर होणार आहे .हॉटस्टारवरही दर्शक सामन्याचे लाईव्ह प्रसारण पाहू शकतात. परंतू, यासाठी वापरकर्त्यास प्रीमियम सदस्यता घेणे आवश्यक असेल. यूके-आयर्लंडमधील स्काई स्पोर्ट्स, यूएस-कॅनडामधील विलो टीव्ही अणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील फॉक्स स्पोर्ट्सवरही आयपीएलचे प्रसारण होणार आहे.
आतापर्यंत मुंबई इंडियन्स अणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या मध्ये एकूण 28 सामने झाले आहेत. यामधे मुंबई इंडियन्स संघाने 17 सामन्यात विजय संपादन केला आहे, अणि उरलेल्या 11 सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज या संघाने विजय मिळविला आहे. त्यामुळे अर्थातच मुंबई इंडियन्स संघाचं पारडं जड असेल. शिवाय हा संघ गतविजेता आहे, अणि या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा याच्याकडे आहे. या संघामध्ये फक्त एकच उणीव आहे, ती म्हणजे त्यांचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगा, कारण याने वैयक्तिक कारणामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे याची कोण भरून काढणार याची चिंता कर्णधार रोहित शर्माला असणार आहे.
तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ताफ्यातील काहीजण पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर सुरेश रैना अणि हरभजन सिंग यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज या संघाने इतर संघाच्या तुलनेत सराव शिबिराला उशिरा सुरवात केली, अशा अनेक अडचणींचा सामना आतापर्यंत या संघाने केला आहे. तसेच सुरेश रैना अणि हरभजन सिंग यांच्या जागेवर कोणाला खेळवायचे ही एक समस्या त्यांच्यापुढे असेल. कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी हा सर्वात अनुभवी कर्णधार आहे,त्यामुळे या सलामीच्या सामन्यात त्याची काय रणनीती असणार आहे, हे पाहणं महत्त्वाचे असेल, याबरोबरच कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकता वाढवणार आहे.