शारजा – सलामीवीर मयंक अग्रवालच्या शानदार शतकी आणि कर्णधार के एल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान राॅयल्समोर विजयासाठी 224 धावांचे आव्हान ठेवले आहे. किंग्स इलेव्हन पंजाबने 20 षटकांत 223 धावा केल्या.
कर्णधार स्टिव्ह स्मिथने टाॅस जिंकून गोलंदाजी स्विकारताना किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर सलामीवीर मयंक अग्रवाल आणि के एल राहुलने तूफान फटकेबाजी करताना पहिल्या विकेटसाठी 183 धावांची भागिदारी केली. मयंक अग्रवालने 50 चेंडूत (7 षटकार आणि 10 चौकार) 106 धावा केल्या. संघाची धावसंख्या 18 षटकांत 194 असताना के एल राहुल बाद झाला. त्याने 54 चेंडूत (1 षटकार व 7 चौकार) 69 धावा केल्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 9 चेडूंत 13 आणि निकोलस पूरनने 8 चेंडूत (3 षटकार व 1 चौकार) नाबाद 25 धावा करत संघाची धावसंख्या 223 पर्यंत नेली.
Innings Break!
That was an absolute carnage here in Sharjah as the @lionsdenkxip post a mammoth total of 223/2 on the board.#Dream11IPL #RRvKXIP pic.twitter.com/kXVsfYVX2G
— IndianPremierLeague (@IPL) September 27, 2020
राजस्थान राॅयल्सकडून गोलंदाजीत अंकित राजपूत (4 षटकांत 39 धावा) आणि टाॅम करन (4 षटकांत 44 धावा) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. जोफ्रा आर्चर (4 षटकांत 46 धावा) आणि श्रेयस गोपाल (4 षटकांत 44 धावा) यांची गोलंदाजी महागडी ठरली. अंकित राजपूतने 4 षटकांत 39 तर जयदेव उनादकटने 3 षटकांत 30 धावा दिल्या.