आतापर्यंत आयपीएलमध्ये या 3 खेेळडूंनी 99 धावा केल्या मात्र शतक गाठू शकले नाही!

Madhuvan

 

आयपीएल च्या 13 पर्वात दहावा सामना सोमवारी (28 सप्टेंबर) मुंबई इंडियन्स अणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात झाला. या सामन्यात बेंगलोर संघाने सुपर ओव्हर मध्ये विजय मिळवला.
या सामन्यात तुफान फटकेबाजी करताना ईशान किशन 58 चेंडूत 99 धावा केल्या.
मात्र शतकाला एक धाव कमी असताना बाद झाला. अन्यथा या पर्वातील तिसरे शतक ही भारतीय युवा खेळाडूच्या नावावर झाले असते. आतापर्यंत आयपीएलमध्ये तेरा सीझन पार पडले आहेत. आयपीएलच्या इतिहासात 99 धावांवर बाद होणारा ईशान किशन तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी विराट कोहली अणि पृथ्वी शा 99धावांवर बाद झाले आहेत.
महत्वाचे म्हणजे बाद होणारे तीनही खेळाडू भारतीय आहेत.

1. 2013 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध विराट कोहली 99 धावांवर बाद झाला होता.

2. 2019 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पृथ्वी शा 99 धावांवर बाद झाला होता.

3. 2010 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध ईशान किशन 99 धावांवर बाद झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.