IPL 2018 ; सोशल मीडियावर हैदराबादची जोरदार खिल्ली

मुंबई: महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत आयपीएल 2018 चे जेतेपद पटकावले. यानंतर चेन्नईच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात अंबाती रायडूने विजयी चौकार लगावताच चेन्नईच्या संघाने एकच जल्लोष केला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी चेन्नईच्या संघाचे अभिनंदन केले. आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजांची फळी असलेला संघ अशी हैदराबादची ओळख होती. मात्र कालच्या सामन्यात हैदराबादचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. यानंतर चेन्नईच्या चाहत्यांनी हैदराबादची जोरदार खिल्ली उडवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/SirJadejaaaa/status/1000782764054999041

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)