IPL 2018 : सनरायजर्स हैदराबाद 31 धावांनी विजयी…

मुंबई – सनरायजर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्स’ला दिलेले 119 धावांचे आव्हान त्यांना गाठता आले नाही. मुंबई इंडियन्सचा संघ केवळ 87 धावा बनवू शकला. 31 धावांनी सनरायजर्स हैदराबादने मुंबईचा पराभव केला.

मिशेल मॅकक्‍लॅनेघन आणि हार्दिक पांड्या यांच्या प्रभावी माऱ्यासमोर सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 23 व्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला हैदराबादचा डाव 18.4 षटकांत 118 धावांवर गुंडाळता आला होता.

मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून हैदराबाद सनरायजर्स संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. मुंबईने आधीच्या सामन्यातील संघ कायम ठेवला होता. मात्र हैदराबादने शिखर धवन, बेसिल थंपी आणि महंमद नबी यांना संघात स्थान दिलेले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)