IPL 2018 : विजेतेपद पटकावण्यात धोनीचा वाटा मोलाचा 

स्टीफन फ्लेमिंग यांची कबुली 
चेन्नई – चेन्नईने यंदा तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावून आयपीएलमधलं पुनरागमन मोठ्या रुबाबात साजरे केले. स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात चेन्नईवर गेली दोन वर्षे बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्याच नेतृत्वाखाली मैदानात उतरताना चेन्नईने आपणच चॅम्पियन असल्याचं सिद्ध करुन दिलं. महेंद्रसिंग धोनी कर्णधार असल्यामुळेच चेन्नईला विजेतेपद मिळाले असून तो या विजयामागचा खरा नायक असल्याचे प्रतिपादन चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयपीएलच्या अकराव्या मोसमात विजेतेपद मिळवल्यानंतर सगळीकडेच चेन्नईच्या खेळाडूंचे कौतुक होत आहे. त्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची भर पडली आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची प्रशंसा करताना फ्लेमिंग म्हणाले की, धोनी हा एक उत्तम संघटक आणि नेता असून त्याच्या डोक्‍यात सतत खेळाचा विचार सुरू असतो. त्याच्याकडे प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत अनेक डावपेच तयार असतात त्यामुळे आमच्या संघाच्या विजयासाठी महेंद्रसिंग धोनीचे संघटनकौशल्य आणि नेतृत्व निर्णायक ठरले.

धोनीला त्याच्या खेळाडूंवर संपूर्ण विश्‍वास असतो आणि तो कोणत्याही खेळाडूकडून त्याला अपेक्षित असलेली कामगिरी करून घेऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंबाती रायुडू हा खेळाडू. धोनीने त्याच्यावर दाखवलेल्या विश्‍वासामुळे रायुडूला आपल्या कामगिरीत सुधारणा करता आली. तसेच फ्लेमिंगने शेन वॉटसनचे कौतुक करताना सांगितले की, सलामीवीर शेन वॉटसनने यंदाच्या आयपीएलमधील दुसरे शतक ठोकताना आमच्या विजयाची निश्‍चिती केली. यापूर्वीच त्याच्या नावावर एक शतक जमा होते.

वास्तविक शेन वॉटसन खेळायला आला तेव्हा पहिल्या 10 चेंडूमध्ये त्याच्या खात्यात एकही धाव नव्हती. मात्र पुढच्या 41 चेंडूंत त्याने 100 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे अंतिम सामन्यात आम्हाला सहज विजय मिळवता आला. शेन वॉटसन चांगला अष्टपैलू खेळाडू असून आम्ही त्याला संघात समाविष्ट करून घेताना त्याच्या बाबतीत वेगळी रणनीती आखली होती. त्यानुसार आम्ही त्याला सलामीवीराची भूमिका पार पाडायला लावली. आम्हाला त्याच्या गोलंदाजीची जास्त गरज पडली नाही. मात्र त्याने त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपली कामगिरी पूर्ण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)