IPL 2018 : मुंबई समोर आज बंगळुरूचे कडवे आव्हान 

बंगळुरू – चेन्नई विरुद्धच्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवत आत्मविश्‍वास कमावलेल्या मुंबई इंडियन्स समोर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सनसनाटी पराभवातून सावरण्यासाठी उत्सुक असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ यांच्यात आयपीएल टी-20 स्पर्धेतील महत्त्वाची लढत आज रंगणार आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामात खराब सुरुवाती नंतर नुकताचा फॉर्म गवसलेल्या मुंबईने गत सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा आठ गडी राखुन पराभव करताना मालिकेत पुनरागमन केले आहे तर दुसरीकडे बंगळुरूची लागोपाठ पराभवांची मालिका सुरुच असून त्यांनी गत सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांमध्ये निराशाजनक कामगिरी करत पराभव ओढावून घेतला आहे.

चालु हंगामात बंगळुरूकडे विराट कोहली, ऍब डीव्हिलिअर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्‍स, ब्रेंडन मॅक्‍युलम, क्‍वन्टन डीकॉक, कॉलिन डी ग्रॅंडहोम, कोरी अँडरसन सारखे तगडे फलंदाज आहेत तरी त्यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करण्यात अपयश आले आहे. मालिकेत आता पर्यंत बंगळुरू कडून विराट कोहली आणि ऍब डीव्हिलिअर्स वगळता इतर फलंदाजांना सुर गवसला नाहीये तर गोलंदाजी मध्ये युझवेंद्र चाहल, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, एम.अश्‍विन, टिम साऊदी,सारखे गोलंदाजही चांगली कामगीरी करु शकले नाहीयेत त्यामुळे बंगळुरूला मालिकेत आपले आव्हान कायम राखायचे असल्यास त्यांना या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.
तर दुसरीकडे मुंबईचे सलामीवीर एविन लुईस आणि सुर्यकुमार यादव व कर्ण्धार रोहित शर्मा वगळता इतर फलंदाजांना सुर गवसलेला नाही त्यामुळे हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 119 धावांच्या माफक आव्हाना समोर त्यांना पराभुत व्हावे लागले होते. त्यामुळे हे तिन फलंदाज वगळता इतर फलंदाजांनाही आपल्या कामगीरीत सुधारणा करणे आवश्‍यक असून मुंबईच्या गोलंदाजांनाही आपली कामगीरी उंचवावी लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रतिस्पर्धी संघ – 
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कायरॉन पोलार्ड, मुस्तफिझुर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, ईशान किशन, राहुल चाहर, एविन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जीन पॉल ड्युमिनी, ताजिंदर सिंग, शरद लुंबा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयंक मार्कंडे, अकिला धनंजय, अनुकूल रॉय, मोहसीन खान, एम. डी. निधीश व मिचेल मॅकक्‍लॅनेघन.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), ऍब डीव्हिलिअर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्‍स, युझवेंद्र चाहल, उमेश यादव, ब्रेंडन मॅक्‍युलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्‍विन्टन डीकॉक, मोहम्मद सिराज, कॉलिन डी ग्रॅंडहोम, कोरी अँडरसन, एम.अश्‍विन, पार्थिव पटेल, मोईन अली, मनदीप सिंग, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साऊदी, कुलवंत खेजरोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे व अनिरुद्ध जोशी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)