IPL 2018 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतला निर्णय

मुंबई – चांगले खेळाडू असूनही स्पर्धेत सातत्याने अपयशाचा सामना करावा लागलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आज होणाऱ्या सामन्यात या मोसमातील सर्वात समतोल समजल्या जाणाऱ्या सनरायजर्स हैदराबादच्या संघाचे आव्हान आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

चालू हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार असून पहिल्या फेरीच्या सामन्यात हैदराबादने मुंबईचा दोन चेंडू राखून पराभव केला होता. या हंगामात आतापर्यंत दोन्ही संघांनी पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी मुंबईला केवळ एका सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तर हैदराबादने तीन सामन्यात विजय मिळवला असून त्यांना दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)