IPL 2018 : मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

जयपुर- आयपीएलच्या अकराव्या हंगामात लागोपाठ तीन पराभवानंतर विजयी मार्गावर परतलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघासमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. दरम्यान  मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या दहाव्या हंगामात विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सची चालू हंगामात सुरुवात खराब झाली होती त्यांना आपल्या पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्पर्धेत समतोल संघ असूनही मुंबईला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती, त्यांचे सलामीवीर आणि मधल्या फळीतील फलंदाज सातत्याने अपयशी ठरत होते.

मात्र बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात सलामीवीर एविन लुईस आणि रोहीत शर्मा फॉर्मात परतल्याने मुंबईने सलग तीन पराभवानंतर विजयाची चव चाखली मात्र अजूनही त्यांना हार्दीक, कृनाल व पोलार्ड यांचा फॉर्म सतावत आहे. त्यातच त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात जायबंदी झाल्याने मालिकेत फॉर्मात असणारा फलंदाज त्यांना गमवावा लागला आहे, त्यामुळे त्यांच्यावर दबाव असणार आहे. तर मिचेल मॅकलघन, जसप्रीत बुमराह, मुस्तफिझूर रेहमान सारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज खराब कामगिरी करत असल्याने त्यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या आहेत.या सामन्यात मुंबईच्या तुलनेत  राजस्थानचे पारडे जड मानण्यात येत आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)