IPL 2018 : मुंबई आणि राजस्थान आज एकमेकांशी भिडणार

जयपुर- आयपीएलच्या अकराव्या हंगामात लागोपाठ तीन पराभवानंतर विजयी मार्गावर परतलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघासमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे. आयपीएलच्या दहाव्या हंगामात विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सची चालू हंगामात सुरुवात खराब झाली होती त्यांना आपल्या पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्पर्धेत समतोल संघ असूनही मुंबईला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती, त्यांचे सलामीवीर आणि मधल्या फळीतील फलंदाज सातत्याने अपयशी ठरत होते तर रोहित शर्मा, हार्दीक पांड्या, कृनाल पांड्या व कायरन पोलार्ड अपयशी ठरल्याने त्यांना सलग तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

मात्र बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात सलामीवीर एविन लुईस आणि रोहीत शर्मा फॉर्मात परतल्याने मुंबईने सलग तीन पराभवानंतर विजयाची चव चाखली मात्र अजूनही त्यांना हार्दीक, कृनाल व पोलार्ड यांचा फॉर्म सतावत आहे. त्यातच त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात जायबंदी झाल्याने मालिकेत फॉर्मात असणारा फलंदाज त्यांना गमवावा लागला आहे, त्यामुळे त्यांच्यावर दबाव असणार आहे. तर मिचेल मॅकलघन, जसप्रीत बुमराह, मुस्तफिझूर रेहमान सारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज खराब कामगिरी करत असल्याने त्यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

तर दुसरीकडे मालिकेत दोन विजय आणि तीन पराभवाला सामोरे गेलेल्या राजस्थान रॉयल्सला विजयी मार्गावर परतण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. राजस्थानकडे चांगले फलंदाज आणि गोलंदाज असतानाही त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नसल्याने त्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यातच मालिकेत त्यांच्या कडून चांगली कामगीरी करणारा संजु सॅमसन गेल्या दोन सामन्यात एकेरी धावा करुन बाद झाल्याने त्यांच्या वरील संकट आणखीन वाढले आहे. तर त्यांचे गोलंदाज देखील धावांची खैरात वाटत असल्याने प्रतिस्पर्ध्यांवर कोणतेही दडपण आणण्यास त्यांना अपयश येत आहे त्यामुळे त्यांना विजय मिळवायचा असल्यास फलंदाजी आणि गोलंदाजीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

   प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई इंडीयन्स – रोहीत शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दीक पांड्या, किरन पोलार्ड, मुस्तफिझूर रेहमान, पॅट कमिन्स, सुर्यकुमार यादव, कृनाल पांड्या, इशान किशन, राहुल चहार, एवीन लेविस, सौरभ तिवारी, बेन कटींग, प्रदीप सांगवान, जीन पॉल ड्युमिनी, ताजिंदर सिंग, शरद लुंबा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयंक मार्कंडे, अकिला धनंजय, अनुकुल रॉय, मोहसिन खान, एम.डी.निधीश, मिचेल मॅकलघन.

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), अंकित शर्मा, संजु सॅमसन, बेन स्टोक्‍स, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, डार्सी शॉर्ट, दुश्‍मंथा चमीरा, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, एस.मिधुन, जयदेव उनाडकत, बेन लॉफलिन, प्रशांत चोप्रा, क्रिश्‍नप्पा गौथम, महिपाल लोमरोर, जतिन सक्‍सेना, अनुरीत सिंग, आर्यमान बिर्ला, जोस बटलर, हेन्रीच क्‍लासीन, झहिर खान आणि राहुल त्रिपाठी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)