IPL 2018 : मुंबईचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

पुणे – स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी धडपडत असलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर आयपीएलच्या 11 व्या मोसमातील परतीच्या साखळी सामन्यात आज  पुन्हा एकदा बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आव्हान आहे. या मोसमातील उद्‌घाटनाच्याच सामन्यात चेन्नईकडून पराभूत झालेला मुंबई इंडियन्स संघ त्याची परतफेड करण्यासाठी उत्सुक असेल. दरम्यान मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने या मोसमातील पहिला सामना जवळजवळ जिंकला होता. परंतु चेन्नईकडून अखेरच्या क्षणी ड्‌वेन ब्राव्होने केलेल्या अफलातून फटकेबाजीमुळे मुंबईच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. चेन्नईने तो सामना केवळ एक विकेट आणि एक चेंडू राखून जिंकला होता. परंतु मुंबईला या वेळी चेन्नईवर तितके वर्चस्व गाजविता येईल असे दिसत नाही. तसेच मुंबईसाठी हा सामना “जिंकू किंवा मरू’ असा असल्यामुळे  त्यांच्यावर प्रचंड दडपणही असणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)