IPL 2018 : बलाढ्य चेन्नई समोर आज दिल्लीचे आव्हान

पुणे  – आयपीएलच्या अकराव्या मोसमात संतुलित कामगिरी करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज समोर आज कर्णधार बदलल्या नंतर विजयी मार्गावर परतलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान असणार आहे.

आयपीएलच्या अकराव्या हंगामात अनेक चढ उतार पाहिलेल्या दिल्लीच्या संघ सध्या गुणतालिकेत तळाच्या स्थानी आहे. चालू मोसमात दिल्लीकडे श्रेयस अय्यर, गौतम गंभीर, ऋषभ पंत, ख्रिस मॉरीस, ग्लेन मॅक्‍सवेल, कॉलिन मुन्रो, डॅनिअल ख्रिच्शन, जेसन रॉय, सारखे तगडे फलंदाज तर अमित मिश्रा, शहाबाज नदीम, मोहोम्मद शमी, ट्रेंट बोल्ट सारखे उच्चदर्जाचे गोलंदाज असतानाही दिल्लीला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नव्हती.

मात्र गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीच्या संघाने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करत गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये उत्कृष्ठ कामगिरी नोंदवत 55 धावांनी विजय मिळवला होता. त्या मुळे कर्णधार बदलल्यावर संघाचं नशिबही बदलत, असं म्हटलं जातं, याचाच प्रत्यय शुक्रवारी झालेल्या सामन्यात आला होता.

त्या सामन्यात कर्णधार श्रेयस आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 219 धावा केल्या. ज्यात श्रेयसने फक्त 40 चेंडूंत 3 चौकार आणि 10 षटकारांच्या जोरावर नाबाद 93 धावांची तुफानी खेळी साकारली. तर पृथ्वी शॉने दमदार सलामी देताना 44 चेंडूंत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 62 धावा केल्या होत्या. यावेळी गोलंदाजी मध्येही दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली कामगीरी केली होती. दिल्लीच्या संघाला विजय मिळवायचा असेल तर तशीच कामगिरी आजच्या सामन्यात करणे गरजेचे आहे.

तर दुसरीकडे आयपीएलच्या चालू मोसमातील पहिल्या सामन्यापासून चांगली कामगिरी करणाऱ्या चेन्नईला मुंबई विरुद्धच्या आपल्या अखेरच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आपली विजयी लय परत मिळवण्याच्या दृष्टीने चेन्नई आजच्या सामन्यात फलंदाजीस उतरेल. चालू हंगामात चेन्नईकडून जवळपास सर्वच फलंदाजांनी त्यांच्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना संघाच्या विजयात हातभार लावला आहे. त्यात अंबाती रायुडू, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी फॉर्मात असल्याने दिल्लीच्या गोलंदाजांना त्यांना रोखण्यासाठी विशेष रणनीती आखावी लागणार आहे.

   प्रतिस्पर्धी संघ –

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रविंद्र जडेजा, फाफ ड्यु प्लेसीस, हरभजन सिंग, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, दिपक चहार, के.एम.असिफ, कनिश्‍क सेठ, लुंगी नगिडि, ध्रुव शौर्य, मुरली विजय, सॅम बिलिंग, मार्क वूड, क्षितिज शर्मा, मोनु कुमार, चैतन्य बिश्‍नोई, इम्रान ताहिर, कर्न शर्मा, शार्दुल ठाकूर, एन. जगदीशन.

दिल्ली डेअरडेव्हिल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), गौतम गंभीर, ऋषभ पंत, ख्रिस मॉरीस, ग्लेन मॅक्‍सवेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, शहाबाज नदीम, विजय शंकर, राहुल टवेटीया, मोहोम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, कॉलिन मुन्रो, डॅनिअल ख्रिच्शन, जेसन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ, गुरकीरत सिंग मान, अवेश खान, अभिषेक शर्मा, जयंत यादव, हर्शल पटेल, मन्जोत कालरा, संदीप लामिचाने, सयन घोश.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)