IPL 2018 : बंगळुरूचे कोलकाता समोर 176 धावांचे आव्हान

बंगळुरू  – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होत असलेल्या महत्त्वपूर्ण लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या झंजावती नाबाद 68 धावांच्या जोरावर बंगळुरूने निर्धारीत 20 षटकात 4 गडी गमावत 175 धावा करत कोलकाता समोर विजयासाठी 176 धावांचे आव्हान ठेवले आहे.

नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरूने आज सावध सुरुवात केली. त्यामुळे पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांअखेरीच बंगळुरूच्या बिनबाद 40 धावा झाल्या होत्या. आजच्या सामन्यात ऍब डिव्हिलीअर्स खेळनार नसल्याने सलामीवीर म्हणुन संधी मिळालेल्या ब्रॅंडन मॅक्कलम आणि क्विंटन डी कॉकने सावध फलंदाजी करताना 8.1 षटकात 67 धावांची भागीदारी करत बंगळुरूला चांगली सुरूवात करून दिली होती.

मात्र आपल्या धावांचा वेग वाढवण्याच्या नादात क्विंटन डी कॉक 29 धावा काढून कुलदीप यादवची शिकार झाला. डी कॉक बाद झाल्या नंतर पुढच्याच षटकात बंगळुरूला मॅक्कलम आणि मनन व्होराच्या रुपाने दोन धक्के बसले. त्यामुळे त्यांना वेगवान धावा बनवण्यात अडचणी आल्या, मात्र कर्णधार विरात कोहलीने मनदीप सिंगला हाताशी धरुन धावांचा वेग वाढवताना 7.3 षटकांत 65 धावांची भागीदारी केली.

यावेळी मनदीप सिंग मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. मनदीप बाद झाल्यानंतर आलेल्या कॉलिन डी ग्रॅंडहोमला हाताशी धरत विराटने अखेरच्या 2.3 षटकांत वेगाने धावा करत 35 धावांची नाबाद भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर बंगळुरुने सन्मानजनक धावसम्ख्या उभारली. आता गोलंदाज कशी कामगिरी करतात यावरच बंगळूरुचे भवितव्य अवलंबून आहे.

मागच्या सामन्यात सपाटून मार खाणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज रविवारी विजयाच्या प्रतीक्षेत आहे.दोन विजय आणि चार पराभवामुळे आरसीबी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरला तर केकेआरने तीन विजय आणि चार पराभवानंतर चौथे स्थान गाठले.

संक्षिप्त धावफलक – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 20 षटकात 4 बाद 175 (क्विंटन डी कॉक 29, ब्रॅंडन मॅक्कलम 38, विराट कोहली नाबाद 68, आंद्रे रसेल 31-3, कुलदीप यादव 20-1)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)