IPL 2018 : बंगळुरुचा दिल्लीवर दणदणीत विजय…

बंगळुरु  – नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली डेअर डेव्हिल्सने निर्धारीत 20 षटकात पाच गडी बाद 174 धावा करत बंगळुरू समोर 175 धावांचे आव्हान ठेवले होते. हे 175 धावांचे लक्ष रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सहजरीत्या पार करीत दिल्ली डेअरडेविल्सवर दणदणीत विजय मिळविला.

 

दिल्ली डेअरडेविल्स कडून खेळताना रीषभ पंतने आपल्या दणकेबाज फटकेबाजीने बंगळुरुच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्याने 48 चेंडूंत 6 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 85 धावांची तुफानी खेळी साकारली होती. परंतु त्याच्या या खेळीचा दिल्लीच्या संघाला काहीही फायदा होऊ शकला नाही.

 

एबी डी’व्हिलियर्सने साकारलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर बंगळुरुच्या संघाने दिल्लीवर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळविला. त्याने 39 चेंडूमध्ये 10 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 90 धावा बनविल्या.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)