IPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

हैदराबाद – मुंबईविरुद्ध आश्‍चर्यकारक विजय मिळवून पुनरागमन करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादसमोर आज रंगणाऱ्या लढतीत आयपीएलच्या अकराव्या हंगामात भरात असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान आहे. दरम्यान पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब आणि हैदराबाद यांच्यात या मोसमातील हा दुसरा सामना असून यापुर्वी झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत 15 धावांनी विजय मिळविला होता. त्या सामन्यात पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेलने हैदराबादची गोलंदाजी फोडून काढत 63 चेंडूत नाबाद 104 धावांची तडाखेबाज खेळी केली होती.

दुसरीकडे सलग दोन पराभवांमुळे दबावाखाली असलेल्या हैदराबादने मुंबईविरुद्धच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीच्या बळावर केवळ 119 धावांचा बचाव करताना 31 धावांनी विजय मिळवून आपल्या आक्रमणाची धार दाखवून दिली आहे. त्यामुळे आजचा सामना हैदराबादचे गोलंदाज विरुद्ध पंजाबचे फलंदाज असा रंगणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)