IPL 2018 : पंजाबचा कोलकातावर एकतर्फी विजय

कोलकाता- कोलकाता विरुद्ध पंजाब या हाय व्होल्टेज सामन्यात कोलकाताने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात सात बाद 191 धावा फटकावत पंजाब समोर 192 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पंजाबच्या फलंदाजीच्या वेळेस झालेल्या पावसामुळे सामना 13 षटकाचा करण्यात आला त्यामुळे पंजाब समोर 13 षटकात 125 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

कोलकाताच्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांनी कोलकाताच्या गोलंदाजांवर पहिल्याच चेंडूपासून आक्रमण करायला सुरुवात केली. लोकेश राहुलने शिवम मावीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत झोकात सुरुवात केली. तर दुसऱ्या चेंडूवरही राहुलने चौकार लगावला. तर आंद्रे रसेलच्या दुसऱ्या षटकातही त्याने सलग दोन चौकार फटकावले. तर त्याच षटकात गेलने चौकारासह आपल्या धावांचे खाते उघडले. त्यानंतर मात्र गेल आणि राहुल यांनी तडाखेबाज फलंदाजी करत चौथ्याच षटकात धावांचे अर्धशतक फलकावर लावले. यावेळी गेलने फटकेबाजी करत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली.

गेल आपले अर्धशतक पुर्ण करेल असे वाटत असतानाच पावसामुळे खेळ थांबला, त्यावेळी पंजाबने 8.2 षटकांत बिनबाद 96 धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेंव्हा पंजाबला 70 चेंडूत 96 धावा करायच्या होत्या. मात्र पावसामुळे हे आव्हान 13 षटकात 125 धावा इतके करण्यात आले. सामना सुरु झाल्या झाल्या गेलने चौकार लगावत आपले अर्धशतक पुर्न केले. तर राहुलने फटकेबाजी सुरु ठेवत केवळ 27 चेंडूत 60 धावा फटकावल्या. राहुलला बाद करत नारायणने कोलकाताला पहिला बळी मिळवून दिला. मात्र गेलने उर्वरीत धावा सहज पुर्ण करत पंजाबच्या विजयावर षटकाराने शिक्का मोर्तब केला. यावेळी गेलने 38 चेंडूंचा सामना करताना पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा केल्या तर मयंक अग्रवालने नाबाद दोन धावा केल्या.

तत्पुर्वी, पहिलांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकाताच्या ख्रिस लिनच्या फलंदाजीपुढे पंजाबचे गोलंदाज हतबल झालेले पाहायला मिळाले. लिन फटकेबाजी करत असताना कोलकात्याचा संघ सहजपणे दोनशे धावांचा उंबरठा ओलांडेल असे वाटत होते. पण लिन बाद झाला आणि कोलकात्याला 191 धावांवर समाधान मानावे लागले. लिनने आपल्या या खेळीत 41 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 74 धावा फटकावल्या. लिनला 62 धावांवर असताना बरिंदर सरणने जीवदान दिले होते, पण या जीवदानाचा फायदा त्याला उचलता आला नाही.

लिन वगळता कोलकाता कडून रॉबीन उथप्पा आणि कर्नधार दिनेश कार्तीक यांनी फटकेबाजी करत संघाला 191 धावा करुन देण्यात मोलाचे योगदान दीले. उथप्पाने 23 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 34 धावा फटकावल्या तर कार्तीकने 28 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 43 धावा फटकावल्या.

 संक्षिप्त धावफलक – कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकात 7 बाद 191 (लिन 74, उथप्पा 34. कार्तीक 43, सरन 50-2), पराभुत विरुद्ध किंग्ज एलेवन पंजाब 11.1 षटकात 1 बाद 126 (ख्रिस गेल नाबाद 62, लोकेश राहुल 60)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)