IPL 2018 : पंचांना कामगिरीत सुधारणा करण्याची ताकीद 

आयपीएलच्या अकरावा मोसम अनेक कारणांनी गाजला असून यात पंचांनी केलेल्या चुकांची भर पडली आहे, त्यामुळे नाराज झालेले आयपीएल आयुक्‍त राजीव शुक्‍ला यांनी पंचांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची ताकीद देण्याचा आदेश सामनाधिकाऱ्यांना दिला आहे. आयपीएलच्या चालू मोसमात अनेक समस्यांवर मात करत आयपीएलची घोडदौड सुरू आहे, मात्र दोन आठवड्यांपूर्वी राजस्थान विरुद्ध हैदराबाद या सामन्यात पंचांच्या चुकीमुळे सात चेंडूंचे षटक टाकले गेले होते.

तर चेन्नईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन “नो बॉल’वर बाद झाला होता. तो चेंडू सरळ सरळ त्याच्या कंबरेच्या वर फुलटॉस पडलेला दिसत असतानाही पंचांनी “नो बॉल’ घोषित केला नव्हता. या सामन्यात हैदराबादचा केवळ 4 धावांनी पराभव झाल्यामुळे हैदराबादच्या चाहत्यांनी यावर आक्षेप घेतला होता. अशा चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी पंचांनी दक्ष राहण्याची ताकीद शुक्‍ला यांनी दिली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)