ipl 2018 ; धोनीच्या ‘त्या’ निर्णयामुळे सामना फिरला !

मुंबई : महेंद्रसिंह धोनीने यपीएलच्या अंतिम फेरीत धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या संघातून हरभजन सिंगला वगळून कर्ण शर्माला संधी दिली तेव्हा साऱ्यांनीच भुवया उंचावल्या होत्या. पण धोनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता.

आयपीएलचा अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर होणार होता. यापूर्वी हरभजन मुंबई इंडियन्सच्या संघात होता. त्यावेळी हरभजनचे वानखेडे हे घरचे मैदान होते. त्यामुळे अंतिम फेरीत हरभजनला खेळवायला हवे, असे संघातील बऱ्याच जणांना वाटत होते. पण धोनीने जेव्हा हरभजनला वगळून कर्णला खेळवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हा निर्णय बऱ्याच जणांना खटकला होता. पण धोनीचा हा निर्णय योग्य असल्याचे तेव्हा दिसून आले जेव्हा कर्णने हैदराबादचा कर्णधार आणि आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या केन विल्यम्सनला बाद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धोनीने अंतिम फेरीत संघात बदल करून साऱ्यांनाच धक्का दिला. पण अंतिम फेरीत संघात बदल करण्याची धोनीची पहिली वेळ नक्कीच नाही. धोनीला पहिल्यांदा कर्णधारपद मिळाले ते 2007 साली. दक्षिण आफ्रिकेत 2007 साली ट्वेन्टी-20 विश्वचषक खेळवण्यात आला होता. या विश्वचषकातील अंतिम फेरीत धोनीने संघात बदल करत युसूफ पठाणला संघात स्थान दिले होते. त्यानंतर 2011 च्या विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना आठवून पाहा. धोनीने अंतिम सामन्यासाठी संघात बदल करत एस. श्रीशांतला संधी दिली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात संघ बदलण्याची रणनीती धोनीच्या यावेळी कामी आली, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)