IPL 2018 : दर्जेदार बंगळुरूसमोर आज बलाढ्य चेन्नईचे आव्हान 

बंगळुरू – दर्जेदार खेळाडू संघात असूनही कामगिरीत सातत्य नसल्यामुळे अनेकदा पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर आयपीएलच्या अकराव्या हंगामातील आज रंगणाऱ्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे आव्हान आहे. चेन्नईने बंगळुरूवर 13 सामन्यांत विजय मिळविला असून केवळ 7 पराभव पत्करले आहेत. मात्र चिन्नास्वामी स्टेडियमवरील आकडेवारीत दोन्ही संघांनी 3-3 सामने जिंकले आहेत. चालू हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकणार असून आतापर्यंत मालिकेत चेन्नईने चार सामन्यांत विजय मिळवला असून त्यांचा एका सामन्यात पराभव झाला आहे. बंगळुरूने आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांपैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे तर तीन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे स्पर्देतील आव्हान टिकवायचे असल्यास बंगळुरूला आजचा सामना जिंकणे आवश्‍यक आहे.

बंगळुरूचा सलामीवीर क्‍विन्टन डी कॉक सातत्याने अपयशी ठरत असल्याने त्यांना पॉवरप्लेच्या षटकांमध्ये धावा करायला अडचण येत आहे. त्यातच दुसरा सलामीवीर विराट कोहली आणि मधल्या फळीतील ऍब डीव्हिलीअर्स यांना सूर गवसला आहे. कोहली व डीव्हिलिअर्स या जोडीने आयपीएलमध्ये 2361 धावा केल्या असून पहिल्या क्रमांकावर 2787 धावा करणारी गेल-कोहली ही जोडी आहे. शिखर धवन व वॉर्नर जोडी (2357) तिसऱ्या स्थानावर आहे.
त्याचबरोबर बंगळुरूने गोलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. कारण त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला दोनवेळा दोनशेहून अधिक धावा काढायची संधी दिली आहे. त्यातच त्यांचे फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर महागडे ठरले आहेत. वेगवान गोलंदाज बळी मिळवत आहेत, मात्र त्याच बरोबर ते धावांची खैरात करताना दिसून येत आहेत.

दुसरीकडे चेन्नईच्या संघ या मोसमात समतोल कामगिरीचे प्रदर्शन करत असून त्यांच्या बहुतेक प्रमुख फलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांचे गोलंदाज देखील प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात बंगळुरूपेक्षा चेन्नईलाच विजयासाठी पसंती देण्यात येत आहे. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांच्यावर दुखापतीचे सावट असल्यामुळे चेन्नईला सावध राहावे लागणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ – 
चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फाफ ड्यु प्लेसिस, हरभजन सिंग, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, दीपक चाहर, के.एम.आसिफ, कनिश्‍क सेठ, लुंगी एन्गिडी, ध्रुव शौर्य, मुरली विजय, सॅम बिलिंग, मार्क वूड, क्षितिज शर्मा, मोनू कुमार, चैतन्य बिश्‍नोई, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दूल ठाकूर व एन. जगदीशन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), ऍब डीव्हिलिअर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्‍स, युझवेंद्र चाहल, उमेश यादव, ब्रेंडन मॅक्‍युलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्‍विन्टन डीकॉक, मोहम्मद सिराज, कॉलिन डी ग्रॅंडहोम, कोरी अँडरसन, एम.अश्‍विन, पार्थिव पटेल, मोईन अली, मनदीप सिंग, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साऊदी, कुलवंत खेजरोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे व अनिरुद्ध जोशी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)