IPL 2018 : चेन्नईचा दिल्लीवर 13 धावांनी विजय…

पुणे – चेन्नईने दिलेल्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने ऋषभ पंत, आणि विजय शंकरच्या खेळी मुळे दिल्लीने निर्धारीत 20 षटकात पाच गडी गमावत 198 धावाच करता आल्याने त्यांनी हा सामना 13 गमावला. या विजयाने चेन्नईने गुणतालीकेत पहिला क्रमांकावर झेप घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची खराब सुरूवात झाली होती, त्यांचा सलामीवीर पृथ्वी शॉ केवळ नऊ धावा करुन परतला तर कर्णधार श्रेयस अय्यर देखील 13 धावा करुन बाद झाला तर दुसरा सलामीवीर कॉलिन मुन्रो आणि ग्लेन मॅक्‍सवेल लागोपाठ परतल्यानंतर ऋषभ पंत आणि विजय शंकरने 9.1 षटकात 88 धावांची वेगवान भागीदारी केली. यावेळी पंतने 45 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि 4 षटकारांसह 79 धावा केल्या. तर विजय शंकरने शेवटच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करताना दिल्लीला विजयाच्या समीप आणले होते. यावेळी विजयने 31 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावा फटकावल्या.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस, कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अंबाती रायुडू यांच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर निर्धारीत 20 षटकांत चार गडी गमावत 211 धावा करुन दिल्ली डेअरडेव्हिल्स समोर विजयासाठी 212 धावांचे आव्हान ठेवले होते.

दिल्लीने आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत चेन्नईचे सलामीवीर वॉटसन आणि ड्यु प्लेसिस यांनी पहिल्या षटकापासून फटकेबाजी करत चेन्नईला आक्रमक सुरुवात करुन दिली. यावेळी फटकेबाजी करताना त्यांनी 11व्या षटकातच संघाचे शतक पुर्ण केले. शतक पुर्ण झाल्या झाल्याच विजय शंकरच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात प्लेसिस बाद झाला. वॉटसन आणि प्लेसिसने 10.5 षटकात 102 धावांची भागीदारी केली. यावेळी प्लेसिसने 33 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. प्लेसिस बाद झाल्यानंतर आलेल्या रैनाला देखील बाद करत दिल्लीच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले.

लागोपाठ दोन गडी बाद झाल्यामुळे चेन्नईचा धावांचा वेग काहीसा मंदावला होता, मात्र तेराव्या षटकात वॉटसन आणि रायुडूने 15 धावा वसूल करत रणरेट पुन्हा वाढवला. मात्र वेगाने धावा करण्याच्या नादात वॉटसनही बाद झाला. त्याने 40 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. वॉटसन बाद झाल्यानंतर आलेल्या धोनीने फटकेबाजी करताना 17व्या षटकात 21 धावा वसूल केल्या.

अखेरच्या षटकांमध्ये रायुडू आणि धोनीने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर चेन्नईने सन्मानजनक धावसंख्या उभारली. धोनी आणि रायुडूने 6 षटकांमध्ये 79 धावांची भागीदारी केली. यावेळी रायुडूने 41 धावा केल्या तर धोनीने 21 चेंडूंमध्ये नाबाद 51 धावा करत वेगवान अर्धशतक झळकावले.

https://twitter.com/ChennaiIPL/status/991016258358263808

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)