IPL 2018 ; गौतम गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद सोडले

नवी दिल्ली :  गौतम गंभीरने दिल्ली संघाच्या कर्णधारपदचा राजीनामा दिला आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वामध्ये दिल्ली संघाने आयपीएलच्या 11 व्या सत्रामध्ये सहा सामन्यामध्ये पाच पराभव स्वीकारले. 11 व्या सत्रातील पराभवाची जबाबदारी घेत गौतमने दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषद घेत गौतम गंभीरने ही माहिती दिली. गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयस अय्यरकडे दिल्लीच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आयपीएलच्या 11 व्या सत्रासाठी झालेल्या लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने गौतम गंभीरला 2.8 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले होते.  आयपीएलच्या पहिल्या तीन मोसमांमध्ये गंभीरने दिल्ली संघाचं प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर यावर्षी गंभीरने आपल्याला घरच्या संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर दिल्लीने गंभीरला खरेदी केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)