IPL 2018 : कोहलीने दिला गोलंदाजांनाच दोष

 इतकी खराब गोलंदाजी स्वीकारार्ह नाही

बंगळुरू  – फलंदाजांनी दमदार कामगिरी करीत 205 धावांची मजल मारून दिल्यानंतर बंगळुरू संघ चेन्नईविरुद्ध पहिल्या साखळी सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याची स्वप्ने पाहात होता. परंतु गोलंदाजांनी केलेल्या दिशाहीन माऱ्याचा पुरेपूर फायदा घेत महेंद्रसिंग धोनी आणि अंबाती रायुडू यांनी चेन्नईला रोमांचकारी विजय मिळवून दिला. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने या पराभवाबद्दल गोलंदाजांनाच दोष दिला.

चेन्नईची एक वेळ 4 बाद 74 अशी घसरगुंडी झाली होती. परंतु रायुडूने 53 चेंडूंत 82 आणि महेंद्रसिंग धोनीने 34 चेंडूंत नाबाद 70 धावा फटकावून चेन्नईला अविश्‍वसनीय विजय मिळवून दिला. बंगळुरूच्या डावांत 16 षटकार लगावले गेले होते. परंतु चेन्नईने 17 षटकार लगावताना विजयाची नोंद केली. धोनीने आपल्या खेळीत सात षटकार लगावले. इतकेच नव्हे तर षटकार लगावूनच त्याने चेन्नईचा विजय साकार केला. धोनी-रायुडू जोडीने 8.5 षटकांत 101 धावांची भागीदारी करीत चेन्नईला विजयानजीक नेले. रायुडू अखेरच्या सत्रात धावबाद झाल्यावर ब्राव्होने धोनीला साथ देत विजय खेचून आणला.

पहिले चार फलंदाज 74 धावांत तंबूत परतल्यावर पुढच्या विकेटसाठी 101 धावा देणे हा गुन्हाच असल्याचे सांगून कोहली म्हणाला की, आम्ही 205 धावांचा बचाव करू शकत नसलो, तर निश्‍चितच काहीतरी चुकीचे घडत आहे. दोन्ही संघांमधील फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. परंतु फिरकी गोलंदाज वर्चस्व गाजवीत असताना आमच्या गोलंदाजांचे अपयश धक्‍कादायक होते. आता गोलंदाजांशी संवाद साधून त्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे.

कोहलीने केली धोनी-रायुडूची प्रशंसा

कोहलीने अंबाती रायुडू आणि धोनी यांच्या फलंदाजीची प्रशंसा केली. रायुडूला मी गेल्या 15 वर्षांपासून पाहात आहे. त्याने भारताकडूनही चमकदार कामगिरी केली आहे. त्याचा दृष्टिकोन अफलातूनच होता. कोणाला कधी संधी मिळेल हे सांगता येत नसते. त्यामुळे रायुडूबाबतीत मला खरोखरीच समाधान वाटते. धोनी तर या स्पर्धेत कमालच करीत आहे. त्याचे टायमिंग आणि फटक्‍यांवरील हुकमत जबरदस्त आहे. पण त्याला नेमका आमच्याविरुद्ध असा सूर गवसावा, हे काही फार चांगले नव्हते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)