IPL 2018 : कोलकाताचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

नवी दिल्ली – आयपीएलच्या अकराव्या मोसमातील तीन आठवडे पूर्ण होत असताना गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना मालिकेत संतुलित कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज रंगणार आहे. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या असून दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने कर्णधारपदाचा त्याग केला आहे. त्यामुळे संघ कठीण परिस्थितीत असताना कर्णधारपदाची जबाबदारी नवख्या श्रेयस अय्यरवर येऊन पडली असल्याने दिल्लीसह त्याचीही कसोटी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)