IPL 2018 : आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फुकटात आलो असतो – मोईन अली

बंगळुरू – इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगुळरूकडून खेळणारा मोईन अली याने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फुकटातही आलो असतो असं म्हटलं आहे. बंगळुरूच्या संघाने आयपीएलच्या लिलावात मोईन अलीवर 1.70 कोटी रुपयांची बोली लावून त्याला खरेदी केलं आहे.

एका वेब साईटने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुम्ही मला आयपीएलमध्ये फुकटात खेळण्यास विचारलं असतं तरीही मी खेळलो असतो. मी केवळ अनुभव घेण्यासाठी आणि विशेषतः विराट कोहली, ए.बी.डिव्हिलिअर्स, ब्रेंडन मॅक्‍युलम, क्विंटन डी-कॉक यांच्यासारख्या खेळाडूंसोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये सहभागी झालो असतो असं अली म्हणाला.

कधीकधी त्याच वातावरणात खेळल्यामुळे परिणामही होत असतो, त्यामुळे मला वाटतं आयपीएल योग्य वेळेवर सुरू झालं आहे. हा खूप चांगला अनुभव असून वेगवेगळ्या लोकांकडून विविध कल्पना आणि इतर गोष्टी शिकायला मिळत आहेत असंही अली म्हणाला. मी यापूर्वीही चांगल्या प्रकारे लांब बॉल मारायचो, पण सातत्याने चेंडू दूर टोलवणं मला जमत नव्हतं. मात्र, इकडे मी त्याचा सराव करत आहे. मी आयपीएलमध्ये खेळण्याचा आनंद घेत आहे असंही तो पुढे म्हणाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)