नवी दिल्ली : आयएनएक्स मीडियातील आर्थिक घोटाळ्यात आरोपी असणारे देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पी.चिदंबरम यांनी आपल्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चिदंबरम यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात आज अर्ज दाखल केला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करत चिदंबरम यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
INX Media case: Congress leader P Chidambaram mentions before the Supreme Court seeking an urgent hearing and regular bail in the case. Justice N V Ramana, said that CJI will take a decision later during the day. The file was sent to him for consideration of listing of the matter pic.twitter.com/OezNwHWJrT
— ANI (@ANI) October 3, 2019
पी.चिदंबरम यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी जामिनासाठी अर्ज दाखल करत लवकरात लवकर या प्रकरणावर सुनावणी करण्याची न्यायालयाकडे विनंती केली आहे. दरम्यान, सर्वोच्च् न्यायालयाचे न्यायाधिश एस.व्ही. रमणा यांनी सिब्बल यांच्या विनंतीवर, सरन्यायाधिश या प्रकरणी शुक्रवारी निर्णय द्यायचा की नाही हे ठरवतील तसेच त्यानुसार या प्रकरणावर सुनावणी करण्यात येणार असल्याचे म्हटले. तसेच न्यायाधिशांनी या प्रकरणाची यादी सरन्यायाधिशांकडे पाठवली आहे. दरम्यान, पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामिन देण्यास नकार दिला होता. याच निर्णयाला चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.