आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी चिदंबरम यांना ईडीकडून अटक

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमने पी चिदंबरम यांची तिहार जेलमध्ये चौकशी केली आहे. या चौकशीनंतर चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी आणि अटकेची परवानगी दिली होती. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी पी चिदंबरम ५ सप्टेंबरपासून तिहार जेलमध्ये आहेत.

दरम्यान, आज सकाळी ईडीच पथक पी चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी तिहार जेलमध्ये पोहोचल होत. यादरम्यान चिदंबरम यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आई नलिनसोबत पोहोचले होते. ईडीने पी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना चौकशीची परवानगी दिली. चौकशीदरम्यान हाती लागलेल्या माहितीच्या आधारे अटक करण्याचा निर्णय ईडी घेऊ शकत असही न्यायालयाने सांगितले होते.

कार्ती चिदंबरम यांनी वडिलांची भेट घेतल्यानंतर बोलताना सांगितलं की, “मी माझ्या वडिलांना भेटण्यासाठी आलो होतो. ते व्यवस्थित आहेत. हे जे काही सुरु आहे हे सगळं राजकीय षडयंत्राचा भाग आहे. हा अत्यंत बोगस तपास आहे”.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here