आर्थिक नियोजनात कुटुंब सदस्यांना सामील करावे

मुंबई – कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात सर्व कुटुंबीयांना सामील केल्यानंतर त्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होईल, असे हॅपिनेस फॅक्‍टरी या संस्थेचे संस्थापक अमर पंडित यांनी म्हटले आहे.

रविवारी होणाऱ्या फादर्स डे निमित्त ते म्हणाले की, कुटुंबाचे आर्थिक नियोजन केवळ एकाच सदस्याने करणे आताच्या काळात बरोबर होणार नाही. यात इतर सदस्यांना विशेषतः मुलांना सामील करून घेण्याची गरज आहे. हे करीत असताना मुलांना मूल्याचे महत्त्व वेळोवेळी समजावून सांगावे. पैसा योग्य मार्गाने कमवावा, त्याची योग्य प्रकारे गुंतवणूक करावी, आपले ध्येय आणि प्राधान्यक्रम वेळेवर ठरवावेत, निवड करताना सर्वसमावेशक विचार करावा, संयम बाळगावा, कामाला प्रतिष्ठा देण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये निर्माण करण्याची गरज असल्याचे पंडित यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.