आयपीएल स्पर्धेच्या प्रायोजकतेसाठी अर्ज मागवले

बीसीसीआयकडून नवी नियमावली जाहीर

मुंबई  -व्हिवो या चिनी कंपनीने मुख्य प्रायोजक म्हणून असलेला करार मोडल्यानंतर आता बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेच्या प्रायोजकांसाठी अर्ज मागवले आहेत. तसेच नव्या प्रायोजकांसाठी तसेच सहप्रायोजकांसाठी बीसीसीआयने नवी नियमावलीही जाहीर केली आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे.

बीसीसीआयने प्रायोजकता देऊ इच्छित असलेल्या कंपन्यांना काही नियम व अटी लावल्या आहेत. मुख्य किंवा सहप्रायोजकांना सर्वोच्च बोली लावल्यावर काही अधिकार प्राप्त होत होते. मात्र, आता नव्या नियमांनुसार असे अधिकारही मर्यादेत येणार आहेत. ही स्पर्धा अमिरातीत येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे.

सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक

प्रायोजकता करार, स्पर्धेसाठी आवश्‍यक असलेल्या निर्णयांबाबत येत्या सोमवारी (17 ऑगस्ट) बीसीसीआयची बैठक होणार आहे. या बैठकीत नवा प्रायोजक, सहप्रायोजक तसेच स्पर्धेशी संबंधित अन्य काही गोष्टींबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही बीसीसीआयने सांगितले आहे.

बीसीसीआयची नवी नियमावली

(1)वार्षिक उलाढाल जवळपास 300 कोटी इतकी आहे अशाच कंपन्यांना निविदा पाठवता येईल. तसेच त्यांनी कंपनीचा लेखाजोखाही सोबत जोडणे आवश्‍यक.
पप्रायोजकांशी आता होणारा करार केवळ पुढील चार महिनेच राहील. हा करार 18 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीचा राहील.

(2)कॉर्पोरेट क्षेत्रातील मध्यस्थ किंवा एजंट या करार प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. असा सहभाग समोर आल्यास निविदा रद्द केली जाईल.
पबीसीसीआयशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच सदस्य या कोणत्याही कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणून भाग घेऊ शकत नाहीत.

(3)निविदेत सर्वाधिक बोली लावून हक्‍क मिळणार नाहीत. तर कंपनीचा ब्रॅंड हा आयपीएलसाठी किती फायदेशीर आहे, हा विचारही केला जाईल. तसेच अंतिम निर्णय बीसीसीआय व आयपीएल समितीच घेईल.

Leave A Reply

Your email address will not be published.