ऑस्कर किंवा अकादमी पुरस्कार हा जगातील सर्वात मोठा चित्रपट पुरस्कार मानला जातो. द ऍकॅडमी आणि मोशन पिक्चर्स आर्टस अँड सायन्सेसने त्यांच्या पाहुण्यांची नवीन यादी प्रसिद्ध केली. या वेळी
बॉलीवूडमधून हृतिक रोशन आणि आलिया भट्ट यांचेही नाव असल्याचे सांगितले जात आहे.
या पुरस्कार सोहळ्यात 819 पाहुण्यांना आमंत्रित केले गेले आहे. जर हृतिक आणि आलियाने हे आमंत्रण
स्वीकारले तर याचा अर्थ असा होतो की ते आगामी 93व्या ऑस्कर पुरस्कारांमध्येही मतदान करू शकतील. अकादमी अवॉर्डसच्या या यादीमध्ये नंदिनी श्रीकांत, टेस जोसेफ, वेशभूषा डिझाईनर नीता लुल्ला, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर निष्ठा जैन, अमित मधेशिया, विशाल आनंद, संदीप कमल आणि संगीतकार नंदिता देसाई आदी भारतीय कलाकारांची नावे आहेत.
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास हृतिक रोशन अखेरच्या वेळी टायगर श्रॉफसमवेत “वॉर’ चित्रपटात झळकल होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता चाहते त्यांच्या आगामी “क्रिश-4’ची वाट पाहात
आहेत. दुसरीकडे आलिया सध्या संजय लीला भन्साळी यांच्या “गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. याशिवाय रणबीर कपूरसोबतचा तिचा “ब्रह्मास्त्र’ हा चित्रपटही प्रदर्शित होण्याच्या
प्रतीक्षेत आहे. तत्पूर्वी तिचा “सडक-2′ ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.