उद्योजकांना काश्‍मीरमध्ये येण्याचे निमंत्रण

फळ प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात वाव

पुणे – ऑक्‍टोबर अखेरीस जम्मू-काश्‍मीर संबंधातील 370 कलम रद्द होणार आहे. त्यानंतर देशातील शिक्षण संस्था आणि उद्योगांना काश्‍मीरमध्ये कार्यरत होता येणार आहे. त्या दृष्टिकोनातून काश्‍मीरमधील उद्योग आणि वाणिज्य महासंचालनालय प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून संचालनालयाचे संचालक मोहमंद अहमद शाह यांनी पुण्याला भेट दिली.

पुण्यातील भेटीवेळी त्यांनी शहरातील शिक्षण संस्थांच्या पदाधिकारी आणि उद्योजकांशी चर्चा केली व पुण्यातील शिक्षण संस्थांनी आणि उद्योजकांनी काश्‍मीरमध्ये काम करावे अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले.

कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती ठीक राहिल्यास नोव्हेंबर महिन्यात काश्‍मीरमध्ये गुंतवणूकदारांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून वातावरण निर्मिती करण्यासाठी आम्ही देशातील विविध भागांना भेट देत आहोत. याचाच भाग म्हणून पुणे शहराला भेट देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील भेटीवेळी त्यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर या संस्थेला भेट दिली. जम्मू-काश्‍मीरमध्ये नवे उद्योग सुरू होण्यास मोठ्या प्रमाणात वाव आहे; कारण या क्षेत्रात या अगोदर जम्मू-काश्‍मीरमध्ये फारसे काम झालेले नाही, असे ते म्हणाले. ड्राय फ्रूट, सफरचंद प्रक्रिया, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनासाठी पूरक सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात. तसेच इस्पितळाच्या उभारणीची येथे गरज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.