गुंतवणूकदार सावध ! खरेदी-विक्रीच्या लाटानंतर निर्देशांकांत घट

मुंबई – निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा चालू आहेत. आज दिवसाअखेर शेअर बाजार निर्देशांकात काही प्रमाणात घट नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 206 अंकांनी कमी होऊन 61,143 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 57 अंकांनी कमी होऊन 18,210 अंकांवर बंद झाला.

ऍक्‍सिस बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, इंडसइंड बॅंक, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर एशियन पेंट्‌स, सन फार्मा, इन्फोसिस, स्टेट बॅंक, अल्ट्रा टेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.

बॅंकिंग धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यानंतर निर्देशांकांना आधार मिळाला नाही. जागतिक बाजारातूनही आज नकारात्मक संदेश आले. निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे सावध गुंतवणूकदार जपून व्यवहार करीत असल्याचे वातावरण शेअर बाजारात आहे. आता कंपन्याचे ताळेबंद जाहीर होत आहेत. त्या आधारावर गुंतवणूकदार निवडक व्यवहार करण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.