गुंतवणूक मंत्र: तेजी नसताना पोर्टफोलिओ फायद्यात!

आता या आठवड्यात सर्वत्र दिवाळीचा मुहूर्त खरेदीची चर्चा चालू होईल. परंतु एक परंपरा म्हणून खरेदी करण्याऐवजी ती योग्य वेळेस करणं जास्त महत्वाचं ठरू शकतं. सध्या बाजार अशा ठिकाणी आहे की कांही दिग्गज लोक इथून मोठ्या तेजीबद्दल बोलत आहेत तर कांही विश्लेषक हे जागतिक मंदी गृहीत धरून आणि आपल्याकडील देखील गेल्या आठवड्यापर्यंत जाहीर झालेल्या अर्थव्यवस्थेसंबंधित विविध आकडेवारीचा विचार करून बाजाराबद्दल धास्ती बाळगून आहेत. याउलट, आठवड्यापूर्वी मंदी म्हणून काठावर बसणारे देखील सेन्सेक्‍स 40000 होण्याबद्दलच्या गप्पा करू लागलेत.

नाही म्हटलं तरी, मागील आठवड्यातील तेजीनं अनेकांना पुन्हा बाजारात सक्रिय होण्यासाठी नक्कीच भुरळ घातलीय. आजच्या लेखात सुचवत असलेल्या कंपन्यांचे शेअर्स हे मार्केट लीडर्स असल्याने बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात इथून घट झाल्यास अथवा इथून वाढ झाल्यास त्यास याच कंपन्या कारणीभूत ठरू शकतील हे वेगळं सांगायला नकोच. कारण, बहुतेक मिडकॅप व स्मॉल कॅप कंपन्यांचा बाजार उठल्यानंतर समजा कोणत्याही मोठ्या गुंतवणूकदार संस्थेस नफा काढून घेण्यासाठी किंवा नुकसान भरपाई करण्यासाठी कोणते स्टॉक्‍स शिल्लक असतील तर ते म्हणजे उत्तम कंपन्या.

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणं पुढील कांही वर्षांसाठी कदाचित एनटीपीसी, एसबीआय, कोल इंडिया, पॉवरग्रिड, आयआरसीटीसी, ओएनजीसी, आयओसी, सेल, भेल इ. पीएसयू कंपन्या अनपेक्षित परतावा देऊ शकतील देखील परंतु एक आदर्श पोर्टफोलिओ बनवण्याच्या दृष्टीनं व शेअर्समध्ये नवीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तरी उत्तम अशा कंपन्याच सुचवणं श्रेयस्कर ठरतं..

आता मागील वर्षी, म्हणजे 5 नोव्हेंबर 2018 रोजीच्या लेखात सुचवलेल्या कंपन्यांपैकी एचडीएफसी बॅंक, बजाज फायनान्स, ऑरोबिंदो फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, अव्हेन्यू सुपरमार्ट, इंडिगो, एल अँड टी या कंपन्यांमधून नफा काढून घेऊन मूळ गुंतवणूक कायम ठेवण्यास हरकत नाही. मागील वर्षी सुचवलेल्या या कंपन्यांव्यतिरिक्त खालील कंपन्या या पुढील दोन-तीन वर्षांसाठी गुंतवणुक करण्यास चांगल्या वाटतात.

कोटक बॅंक – उत्तम व्यवस्थापन, आंतरिक मूल्य
एचडीएफसी – व्यवसाय विविधता, क्षेत्रातील अग्रगण्य.
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल – बदलता कल,व्यवसाय वाढीसाठी प्रचंड संधी.
इन्फोसिस – बॅंकिंग क्षेत्रातील बदलतं तंत्रज्ञान, उत्पन्न व मार्जिन्स उजवी.
उज्जीवन – आगळं व उत्तम व्यवसाय मॉड्यूल.
अंबुजा सिमेंट – सरकारी तरतुदीची लाभार्थी, मागणीत सुधारणा.

म्युच्युअल फंड : एसबीआय इक्विटी हायब्रीड ग्रोथ. पुढील तक्ता स्पष्टपणे दर्शवतो की, जर प्रत्येक कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 10000 रु. गुंतवणूक केलेली असल्यास असं आढळून येईल की एकूण 91 हजारांच्या गुंतवणुकीवर एका वर्षात 40 टक्के परतावा दिला आहे तर निफ्टी या निर्देशांकानं याच कालावधीत केवळ 13 % परतावा दिलेला आहे. याचाच अर्थ बाजारात तेजी नसताना देखील आपल्या पोर्टफोलिओनं उत्तम म्हणजे निर्देशांकातील परताव्यापेक्षा सुमारे तिप्पट परतावा दिलेला आहे. (अल्फा = 27).

कदाचित इथून बाजार 15-20% वाढल्यास मिडकॅप / स्मॉलकॅप अथवा सरकारी धोरणांमुळं सरकारी कंपन्यांचे शेअर्स आऊटपरफॉर्म करतीलही. अनेकवेळा ग्रोथ स्टॉक्‍स व व्हॅल्यू स्टॉक्‍स यांमध्ये सर्वसामान्यपणे वर्गीकरण केलं जातं ते म्हणजे ीुींह ीीेंलज्ञी रीश ींहीेश षीे ुहरीं ुश रिू रपव तरर्श्रीश ीीेंलज्ञी रीश ींहीेश षीो ुहळलह ुश सशीं. ज्या कंपन्या गेल्या वर्षांत ग्रोथ स्टॉक्‍स म्हणून अग्रेसर राहिल्या व समजा कांही कारणानं बाजारात मोठी पडझड झाली तर याच कंपन्या तेंव्हा व्हॅल्यू स्टॉक्‍स ठरू शकतील. आता म्हणूनच यांमधील प्रत्येक कंपनीचे शेअर्स काय भावात खरेदी करायचे हा ज्याचा त्याच्या जोखीम क्षमतेचा प्रश्न ठरू शकतो.

उदा. ज्यांना बॅंकिंग क्षेत्रामध्ये अजून पडझड बाकी आहे असं वाटत असेल त्यांनी त्यासाठी निश्चित केलेली रक्कम तूर्त इतर ग्रोथ स्टॉक्‍समध्ये गुंतवून, त्यातून कांही प्रमाणात नफा काढून त्या नफ्यासकट सर्व रक्कम बॅंकिंग क्षेत्रातील पडझड संपली असं वाटल्यास त्यात गुंतवावी, तीच कथा फार्मा क्षेत्राची. आता मागील वर्षी सुचवलेल्या कंपन्यांचे शेअर्स घेतलेल्यांनी हवं तर प्रत्येकी 10 हजारांवरील नफा पदरात पाडून घ्यावा. अजून एक मोलाचा सल्ला मला द्यावासा वाटतो तो म्हणजे प्रत्येक वर्षी आपला पोर्टफोलिओ तपासा मग तो शेअर्सचा असो वा म्युच्युअल फंड्‌सचा असो आणि दरवर्षी त्यातील गुंतवणूक नियमितपणे’ व काटेकोरपणे’ पुनर्रसंतुलित म्हणजे री-बॅलन्स करा. याबाबतीत सविस्तरपणे पुढच्या लेखात..

प्रसाद भावे

Leave A Reply

Your email address will not be published.