गुंतवणुकीचे धडे क्रिकेटच्या भाषेत! (भाग-२)

गुंतवणुकीचे धडे क्रिकेटच्या भाषेत! (भाग-१)

ज्याप्रमाणे सामना खेळण्यापूर्वी संघाचा कर्णधार आणि संघातील मार्गदर्शक खेळाचे नियोजन करत असतात आणि खेळ सुरु झाल्यावर वेळोवेळी गरजेनुसार या नियोजनात आवश्यक ते बदल केले जात असतात. खेळ खेळण्यापूर्वी उद्दीष्टे ठरवली जातात व सर्वात महत्त्वाचे खेळ संपण्यापूर्वी ठरवलेली उद्दीष्टे पूर्णत्वास नेली जातात. ज्या प्रमाणे क्रिकेटचा सामना असो किंवा गुंतवणूक असो खेळातील प्रत्येक खेळाडू व गुंतवणुकीतील प्रत्येक गुंतवणूकदारास संपूर्णतः सहभागी होणे आवश्यक आहे. हे करत असताना सातत्याने आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करणे गरजेचे असते. आपल्या बलस्थानांचा योग्य उपयोग करत उद्दीष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण नियोजन केले जाते. हे करत असताना आपल्या कमकुवत बाबींचाही विचार नियोजनात आवश्यक ते बदल गरजेचे असतात. शेवटी एकमेव उद्दीष्ट जिंकणे हेच असते. हा विजय सहज आणि सुकर तसेच वेळेत होण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातात.

नियोजन – संघातील प्रत्येक खेळाडू क्रीडांगणावर जाण्यापूर्वी संघाच्या कर्णधाराकडून व संघ व्यवस्थापनाकडून एक सुनियोजित धोरणावर व खेळाच्या विविध पैलूंवर लक्ष ठेवून प्रतिस्पर्धी संघाच्या कमजोर बाबींवर व बलस्थानांवर विचार करून तसेच खेळपट्टी आणि वातावरणाचा विचार एक निश्चित स्वरुपाचे खेळाचे नियोजन आखले जाते. त्याचप्रमाणे गुंतवणूक करतानाही आपल्या भविष्यातील उद्दीष्टांसाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असते. पैशाची उपलब्धता, आपल्याकडे असणारा वेळ (जो उद्दीष्ट पूर्ततेसाठी आवश्यक आहे.), उद्दीष्टांसाठी नेमक्या किती पैशांची गरज भासणार आहे. त्यासाठी किती जोखिम उचलण्याची माझी तयारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण यासाठी नेमका कोणता गुंतवणूक पर्याय निवडणार आहोत हे महत्त्वाचे असते.

गुंतवणुकीचे धडे क्रिकेटच्या भाषेत! (भाग-३)

खेळाच्या स्थितीप्रमाणे कोणत्या खेळाडूला कधी गोलंदाजी द्यायची आहे आणि कुणाला कुठल्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायचे याचा निर्णय कर्णधार करत असतो तसेच गुंतवणुकदारांनी वेळोवेळी गरजेनुसार आपल्या गुंतवणुकीमध्ये किती वाढ करायची आहे व गुंतवणूक पर्यायाचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.