गुंतवणुकीत… डोन्ट बी अ ‘वायपर’ (भाग-२)

गुंतवणुकीत… डोन्ट बी अ ‘वायपर’ (भाग-१)

या अनुषंगानेही एक मुद्दा मध्यंतरी श्री आशिष सोमैय्या एम डी मोतीलाल ओसवाल म्युचुअल फंड, यांचे  विचार ऐकण्याचा  योग  आला.. त्यांनी  मला  एक  छान  सल्ला  दिला. ते  म्हणाले ‘मि. भागवत. डोन्ट बी अ वायपर (Wiper). कभी भी  वायपर जैसा मत् सोचना’ गाडीचा वायपर हा अतिशय साचेबद्ध, यांत्रिक पद्धतीने हालचाली करतो. उदा आधी उजवीकडे सरकतो, तेथील पाणी ढकलेपर्यंत त्याच्या डावीकडे पाणी जमा होते. ते कोरडे करायला मग तो डावीकडे सरकतो. पुन्हा उजवीकडे पाणी जमा होते. असे बराचवेळ चालू रहाते. श्री सोमय्या म्हणतात. अशा हालचाली गाडीच्या वायपरने अर्थात करायलाच हव्यात, परंतु अशी पळापळीची भूमिका गुंतवणुकदाराची नसावी. “काय’ गेल्या सहामाही कामगिरीच्या तक्त्यांत Large Caps आघाडीवर आहेत? मग बदला आपल्या योजना, चला Large Capsकडे…” तर काही दिवसांनी  “मिडकॅपमधे रॅली आली की काय? पळा. लवकर तिकडे जाऊया” असा धरसोडीचा विचार करीत बसलो, तर आपला ‘दोन्ही घरचा पाहुणा.’ व्ह्यायचीच शक्यता जास्त.

तेव्हा थोडक्यात काय? माध्यमांतील, साईटसवरील, माहिती जरुर आणि नेहमी तपासावी, अभ्यासावी. पण फक्त तेथील परफॉरर्मन्सवाल्या ‘मेरिट लिस्टचा भुलभुलैया’ बघून घाईघाईने आपले ’उमेदवार’ निवडणे कशाला, एकूणांतच आपल्याला नीटशी माहिती नसताना नेट सर्फींग करुन आपल्या गुंतवणुकीचे पर्याय निवडणे. हे आपल्या छातींत दुखत असता ‘गुगल बाबाला’ विचारुन औषधे घेण्याइतकेच धोकादायक आहे. मुदत विमा (Term), ज्ञान (आणि अर्थातच तारतम्य) यांना आर्थिक नियोजनांत पर्याय नाही. ‘म्युच्युअल फंड सही है’ मगर (सही) ॲडाव्हायजर जरुरी है! कळावे. लोभ असावा, ही  विनंती.

आपला.

(गेल्या 24 वर्षांत ’NFO, FMP, ULIPs, Money Back…’अशा महागड्या आणि बहुतेकदा अशी अपेक्षा सल्लागाराला फायदेशीर योजना ‘एकदाही’ न विकणारा)

Leave A Reply

Your email address will not be published.