नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरात आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेस पक्षाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ एक काळा बॉक्स गाडी मध्ये ठेवताना दिसत आहे. यावर काँग्रेस पक्षाने आरोप करत कर्नाटक मधील चित्रदुर्ग येथे नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टर मधून हा काळा बॉक्स एका गाडीमध्ये ठेवला असून, ती गाडी मोदींच्या ताफ्यातील नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.
Video of the suspicious box, which was offloaded from the PM @narendramodi's helicopter in Chitradurga, Karnataka. pic.twitter.com/d3oL2KbDKN
— Congress Live (@INCIndiaLive) April 14, 2019
कर्नाटका के चित्रदुर्ग में, प्रधानमंत्री मोदी के हेलीकॉप्टर से एक काला बड़ा बक्सा निकाला गया और उसे एक ऐसे निजी वाहन में रखा गया, जो प्रधानमंत्री के काफिले का हिस्सा नहीं था। चुनाव आयोग से हमारा आग्रह है कि इसकी शीघ्र निष्पक्ष जांच हो : @AnandSharmaINC
— Congress Live (@INCIndiaLive) April 14, 2019