“अभाविप’कडून बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
बारामती – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामती शाखेने आज प्रांताधिकारी यांना भेटून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची सखोल चौकशी करण्यात यावे असे निवेदन दिले. वारंवार प्राचार्यांना भेटून ते दखल घेत नाहीत. ग्राहक भांडार ही संस्था महाविद्यालयाच्या आवारात आहे. यांच्यातून मिळणाऱ्या वस्तू महाग मिळतात. तर बाहेरून घ्यायच्या म्हटलं की, त्या स्वस्त दरात मिळतात. यांच्यामध्ये वेळोवेळी प्राचार्यांना भेटून देखील हे मोठ्या प्रमाणात लूट करतात. विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळा आहे.
त्याच्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 100 रुपये त्यांच्या प्रवेश शुल्कमधून घेतले जातात. याच्यात पण लाखो रुपयांची लूट महाविद्यालय प्रशासन करत आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या नावाखाली महाविद्यालय प्रचंड प्रमाणात लूट करत आहे. महाविद्यालयात स्वच्छतागृह नादुरुस्ती, आर्थिक लूट, गैरसोय, अस्वछता असताना तरी या महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळतो कसा? याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय हे अल्पसंख्याक आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया राखीव असून याची देखील सखोल चौकशी व्हावी. यावर एक समिती नेमून या महाविद्यालयाची चौकशी व्हावी.
बारामती शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून हे महाविद्यालय मोठ्या प्रमाणात लूट करत आहे. यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. कारवाई झाली नाही तर आगामी काळात अभाविप रस्त्यावर उतरले. लवकरच आमचे शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटणार आहे, असे अभाविप जिल्हा संयोजक वैभव सोलनकर यांनी सांगितले. निवेदन देते वेळी उपस्थित शहरमंत्री समीर मारकड, बाळासाहेब सोलनकर, तालुका प्रमुख अक्षय नाळे, महाविद्यालय उपाध्यक्ष किशोर आटोळे, तेजस नाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.