पुणे – शहरासह जिल्ह्यात करोनाबाधितांकडून खासगी हॉस्पिटलमध्ये अवाजवी बिलांची रक्कम वसूल केली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या धर्तीवर जिल्ह्यातही दीड लाखांपेक्षा अधिक रकमेच्या करोनाग्रस्तांच्या उपचाराची बिले तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनास केल्या आहेत.
शहरात महापालिकेने खासगी रुग्णालयांच्या करोना उपचार बिलांची तपासणी सुरू केल्यानंतर सुमारे 29 लाखांची बिले कमी झाली होती. या तपासणी मोहिमेची पवार यांनी या बैठकीत विशेष दखल घेतली.