पूर्वी गुंतवणूकदारांना दोनच पर्याय होते. सोने आणि जमीन. आज मात्र गुंतवणुकीचे असंख्य पर्याय निर्माण झाले आहेत. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, गोल्ड इटीएफ यासारख्या पर्यायाची निवड केली जात आहे. मात्र सर्व पर्यायांच्या तुलनेत सर्वाधिक परतावा देणारा पर्याय म्हणून मालमत्ता, रिअल इस्टेटकडे आजही पाहिले जाते.कारण जमीनीच्या वाढत्या किंमती आणि शहरात कमी होणारी जागा यामुळे फ्लॅटचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. असे असले तरी मालमत्तेतील गुंतवणुकीत नेहमीच जोखीम राहिली आहे. अर्थात योग्य किंमत आणि सल्ल्यामुळे मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
मालमत्तेत गुंतवणूक करा; पण… (भाग-२)
निव्वळ गुंतवणूकदारांना सल्ला
मालमत्तेतून केवळ आणि केवळ फायदा मिळवण्यासाठी पैसे गुंतवणाऱ्यांना निव्वळ गुंतवणूकदार असे म्हणतो. हे गुंतवणूकदार मालमत्तेचा खासगी किंवा गरजा भागवण्यासाठी उपयोग करत नाहीत. निवासी मालमत्तेत फ्लॅट, ड्युपलेक्स, बंगला, घर आदी तर व्यावसायिक मालमत्तेत कार्यालय, फॅक्टरी शेड आदी तर रिटेल मालमत्तेत मॉल स्पेसचा समावेश होतो. याशिवाय अविकसित किंवा अर्धवट विकसित मालमत्तेतही गुंतवणूक केली जाते. शुद्ध गुंतवणूकदारांकडे फायदा मिळवण्यासाठी अनेक संधी असतात. कारण त्यांच्याकडे पयाय अनेक असतात. मालमत्ता विक्रीचा उद्देश केवळ फायदा मिळवायचा असल्याने त्यांना विकण्याची कोणतीही घाई नसती.
– कमलेश गिरी