नवी दिल्ली – सॅमसंग कंपनीने आपला नवीन दमदार मिड बजेट रेंजचा स्मार्टफोन Galaxy A21s भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या काही दिवसापूर्वी जागतिक बाजारात लाँच केला होता. हा फोन पंच-होल डिस्प्ले पॅनल, क्वाड रियर कॅमेरा सेट-अप आणि 5,000mAh बॅटरीसह लाँच केला गेला आहे. तसेच फोनमध्ये क्विक फेस रिकॉग्निशन फीचर आणि रियर माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे. यावर्षी लाँच केलेला A51, A71 आणि A31 सारख्या Gen-Z फिरचरसह Galaxy A21s लाँच केला आहे.
तर असा आहे सॅमसंग Galaxy A21s
डिस्प्ले : 6.5″ HD+ LCD Display 720 x 1600
प्रोसेसर : Exynos 850
GPU : ARM Mali-G52 MP1
रॅम : 4GB/6GB
स्टोरेज : 64GB
कॅमेरा : 48MP Quad Camera + 8MP Ultrawide, 2MP Macro Lens + 2MP Depth
फ्रंट कॅमेरा : 13MP
बॅटरी : 5000mAh with 15W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम :OneUI based on Android 10
इतर : Wifi, Bluetooth 5.0, Fingerprint Scanner, Dolby Atmos
सेन्सर्स : Accelerometer, Fingerprint Sensor, Gyro Sensor, Geomagnetic Sensor, Proximity Sensor, Virtual Light Sensing
रंग : Black, Blue White
किंमत : 4GB+64GB 4G ₹ 16990, 6GB+64GB 4G ₹ 18990