दै. प्रभातच्या वतीने आयोजित केलेल्या “ऑटो झोन-2019” मध्ये एसयूव्ही जीप कंपास सादर केली आहे. कंपनीने जीप कंपाससाठी 14.95 लाख रुपये किंमत जाहीर केली आहे. यातील टॉप मॉडेल 20.65 लाख रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जीप कंपासमध्ये 50 हुन अधिक सेफ्टी आणि सिक्युरिटी फीचर्स देण्यात आले आहेत. या फीचर्समध्ये एबीएस, हिल स्टार्ट अॅसिस्ट, अॅडेप्टिव्ह ब्रेक लाईट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि पॅनिक ब्रेक असिस्ट यांसारखे अत्याधुनिक प्रणालीचा समावेश आहे. शिवाय या एसयूव्हीमध्ये सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत.